SALES | यशस्वी विक्री कशी करावी?

SALES | यशस्वी विक्री कशी करावी? विक्री म्हणजे आपल्या जवळील वस्तू व सेवा संभाव्य ग्राहकांना खरेदी करण्यास तयार करणे व त्याचा मोबदला मिळवणे. या प्रक्रियेसाठी कुशल कौशल्य व सुयोग्य व्यवस्थापन असणे फार गरजेचे आहे. एखदा लहान व्यवसाय देखील sales यशस्वी होण्यासाठी विक्रीचे व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. SALES | यशस्वी विक्री कशी करावी हे आपण पाहूया..

SALES | यशस्वी विक्री कशी करावी?

यशस्वी विक्री कशी करावी – विक्रयकला  (Salesmanship)-

Sales घडवून आणण्याची कला. ग्राहकाने वस्तू Product अथवा सेवा Services विकत घ्यावी, यासाठी त्याचे मन वळविण्याची कला म्हणजे विक्रयकला असे म्हणतात. वस्तू खरेदी करण्याची ग्राहकाची इच्छा अधिक तीव्र करणे व त्याचे हित वस्तू खरेदी करण्यातच आहे व याची त्याला खात्री करून देणे, हे या सेल्समनशिप उद्दिष्ट असते. या कलेमुळे संभाव्य ग्राहकाला एखाद्या वस्तूची गरज पटते व त्यातून पुढे ग्राहक व विक्रेता या दोघांनाही समाधान देणारा विक्री व्यवहार घडून येतो.

वस्तू व सेवा उत्पादन –

आपण निर्माण करत असणार्या वस्तू व सेवा या लोकांच्या गरजेच्या असायला हव्यात व त्यांची गुणवत्ता हि उत्तम असायला हवी. मानवी गरज प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पूर्ण करायची क्षमता आपल्या उत्पादनात असायला हवी. sales विक्री मधील पाहिलं पाउल म्हणजे वस्तू आणि सेवा उत्पादन.

कर्मचारी अथवा स्वता –

आपण नव्याने सुरु केलेल्या आपल्या व्यवसायात स्वताच योगदान हे १००% असायला हव. जस जसा आपला व्यवसाय हा वाढत जाईल त्यानुसार योग्य कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत. आपल्या कर्मचार्यांना योग्य ते ट्रेनिंग दिल पाहिजे. विक्री वाढ होण्यासाठी विक्री टीम तयार करून त्यांना त्याचा एरिया ठरवून दिला पाहिजे. व्यवसायात विक्री करणारे कर्मचारी हे प्रशिक्षित असने व त्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे.

मार्केटिंग

मार्केटिंग म्हणजे आपल्या वस्तू आणि सेवा हे संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचवणे म्हणजेच मार्केटिंग होय. मार्केटिंग हे जाहिरात, पामप्लेट, वैयक्तिक विक्री, प्रायोजकत्व, डिजिटल एत्यार्दी द्वारे करता येते. आपल्या कर्मचारी वर्गाकडून बाजारात आपल्या प्रोडक्ट बद्दल जागरूकता निर्माण करणे. योग्य मार्केटिंग आपल्या वस्तू व सेवा यांना ब्रांड बनवते.

वितरण (विक्री) साखळी –

आपण तयार करत असणार्या वस्तू किवा सेवा या ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. ग्राहकाचे अंतिम समाधान करणे हे व्यवसायाचे ध्येय्य असते त्यासाठी वितरण साखळी मजबूत असणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसायातून तयार आलेला माल हा – व्यवासाय ठिकाण (कंपनी)-Distributor – retailer – Customer(ग्राहक).

साठा (stock) व्यवस्थापन –

आपल्या वस्तूची मार्केट मधील मागणी आणि पुरवठा याचा योग्य असा तालमेळ लावून किती प्रमाणात वस्तू ची निर्मित्ती आणि साठा करावा हे समजून घेण गरजेचे आहे.

  • काही प्रमाणात वस्तू चा साठा करणे गरजेचे असते.
  • मार्केट मधील बदलाचा अभ्यास करून वस्तू निर्मिती आणि साठा व्यवस्थापन केले पाहिजे.
आर्थिक व्यवस्थापन –

आर्थिक ताळेबंद हा व्यवसाय लहान असो  किवा मोठा त्याचे अकाउंट व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मार्केट मधली उधारी व त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

  • आपल्या सेल्स टीम ला जास्त सेल्स झाल्यास INCENTIVE देणे गरजेचे आहे.
  • सर्व कमर्चारी वर्गाचा पगार वेळेत दिला तर ते उत्साहाने काम करतील.
  • प्रत्येक ३ महिन्याने आपल्या व्यवसायाचे आर्थिक तपासणी केली पाहिजे त्यामुळे नफा – तोटा याचे गणित लक्षात येईल.  आर्थिक व्यवस्थापन हे व्यवसायाला योग्य ती दिशा देण्याचे काम करते.

आपल्या व्यवसायामध्ये विक्री व्यवस्थापन फार महत्वाचे आहे. यशस्वी व्यवसायिक होण्यासाठी विक्री साखळी व त्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले पाहिजे.

धन्यवाद …

मी Shubahankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

1 thought on “SALES | यशस्वी विक्री कशी करावी?”

Leave a Comment