व्यवसायसुरु करताना महत्वाचे टप्पे | Important Steps in Starting a Business |

व्यवसाय सुरु करायचा विचार केल्यानंतर मनात असंख्य प्रश्न आपल्यासमोर आवर्जून उभे असतात. यातील सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे सुरुवात कशी करावी? यांनतर पडणारा प्रश्न म्हणजे व्यवसाय सुरु करायचा म्हणजे नेमक काय करावे लागते ?व्यवसायाची सुरवात कशी करावी याच्या विसंगती मुळे व मनातील असणारी घालमेल यांमुळे व्यवसाय सुरु करण्यात उशीर होतो, आणि यामुळे आपलेच नुकसान होते. प्रत्येकाला व्यवसायाबद्दल सर्वच माहित असेल नाही व व्यवसायाची पार्श्वभूमी नसल्यामुळे आपण गोंधळून जातो. हे टाळण्यासाठी आपण व्यवसायासाठी घ्यावे लागणारे टप्पे अभ्यासायला हवेत आणि त्यावर काम करून आपण व्यवसायाला सुरवात केली असता कोणताही अडथला अथवा अडचण येणार नाही. यासाठी आपण प्रमुख्याने व्यवसायाचे टप्पे जाणून घेऊयात आणि प्रत्येक्षात आपलयाला कोणत्या पायर्या पार करव्यात लागणार आहेत याची माहिती घेऊयात.

1. व्यवसाय निवड

सर्वात महत्वाची पायरी म्हणजे योग्य व्यवसाय निवड, आपली गुंतवणूक, अनुभव, शिक्षण, क्षमता इ. बाबी पाहून योग्य व्यवसाय निवडला पाहिजे.  मार्केटमधे काय विकणे शक्य आहे याच अभ्यास करुन व्यवसाय करावा. इतरांच्या सांगण्यावरून किवा दुसरा करतोय म्हणून आपण तो व्यवसाय निवडू नका.

2. सर्व्हे

आपल्या कला गुणांना अनुसरून जर आपण व्यवसाय निवडला तर तो करण्यासाठी आपण अधिक उत्तेजित राहतो. आपण निवडलेला व्यवसाय आपल्या स्थानिक भागात त्या संदर्भात सर्व्हे करून एक माहिती पुस्तक तयार करा. आपल्या भागात व्यवसायासाठी संभाव्य किती ग्राहक असतील, वस्तू व सेवेला किती मागणी राहील, आणि आपल्या स्थानिक भागात ग्राहकांना काय हवय याची सर्व माहिती नोंद करून ठेवा.

3. व्यवसाय नोंदणी

निवडलेल्या व्यवसायाच्या रचनेनुसार व्यवसायाची योग्य नोंदणी करणे आवश्यक असते. मॅन्युफॅक्चरिंग व सर्व्हिस व्यवसायासाठी उद्यम नोंदणी करावी. रिटेल शॉप असेल तर शॉप अक्ट नोंदणी, पार्टनरशिप फार्म, LLP, Pvt. Ltd. असे विविध प्रकार यात येतात. आपल्या व्यवसायासाठी कोणती नोंदणी आवश्यक आहे याची माहिती घेऊन नोंदणी करावी.

4. कागदपत्रे आणि लायसन्स

आपण निवडलेल्या व्यवसायासाठी कोणकोणते कागदपत्रे आणि लायसन्स लागतात याची माहिती घेऊन त्यासाठी योग्य ते अर्ज करावेत. तुमच्याकडे व्यवसायाचा दाखला म्हणजेच शॉप लायसन्स व नोंदणी दाखला सर्वप्रथम महत्वाचा आहे. त्यानंतर आपण जो व्यवसाय निवडला आहे त्या निगडीत असणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ, अत्र व औषधे प्रशासन, वजन माप निरीक्षक अशा विविध खात्यांच्या परवानग्या लागू शकतात तर ते सर्व कागदपत्रे तयार करावेत.

5. कायदेशीर आणि नियामक बाबी –

बौद्धिक संपदा संरक्षण: ट्रेडमार्क, कॉपीराइट आणि पेटंटसह तुमच्या बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्याचा विचार करा. तुमच्या निवडलेल्या व्यवसायाचे नाव किंवा उत्पादन विद्यमान ट्रेडमार्कचे उल्लंघन करत नाही याची खात्री करण्यासाठी सखोल शोध घ्या.

रोजगार कायदे: किमान वेतन, ओव्हरटाईम वेतन, कर्मचारी लाभ, भेदभाव विरोधी आणि आरोग्य आणि सुरक्षा मानकांशी संबंधित नियमांसह स्थानिक कामगार कायदे समजून घ्या आणि त्यांचे पालन करा. रोजगार करार आणि धोरणांचा मसुदा तयार करण्यासाठी रोजगार वकिलाचा सल्ला घेण्याचा विचार करा.

डेटा संरक्षण आणि गोपनीयता: डेटा संरक्षण कायद्यांसह स्वत: ला परिचित करा, विशेषत: आपण संवेदनशील ग्राहक माहिती संकलित किंवा हाताळल्यास. डेटा वापरासाठी ग्राहकांची संमती कशी मिळवायची आणि साठवायची ते समजून घ्या आणि योग्य सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करा.

करार आणि करार: करार, भाडेपट्टे, विक्रेता करार आणि तुमच्या व्यवसायाशी संबंधित इतर कायदेशीर कागदपत्रे तयार करताना किंवा पुनरावलोकन करताना कायदेशीर सल्ला घ्या. स्पष्ट आणि चांगले मसुदा तयार केलेले करार तुमच्या स्वारस्यांचे संरक्षण करण्यात आणि विवाद टाळण्यास मदत करू शकतात.

6. प्रोजेक्ट रिपोर्ट

व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला आवश्यक तेवढ भांडवल आपल्याकडे उपलब्ध नसते, त्यावेळी कर्ज घ्यायचे असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट आवश्यक असतो. प्रोजेक्ट रिपोर्ट साठी मशिनरी, कच्चा माल कोटेशन्स आवश्यक असतात. ज्या गरजेच्या बाबींची पूर्तता करून वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी प्रस्थाव करावा. व्यवसायाची भविष्यातील व्याप्ती किती असेल त्याच प्रमाणे प्रत्येक व्यवसाया गणित प्रोजेक्ट रिपोर्ट हा वेगवेगळा असतो. प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी CA ची मदत घेऊ शकता. शक्यतो CA अप्रुव्हड रिपोर्टच मान्य केला जातो. काही MSME लघुद्योगांसाठी फक्त तयार प्रोजेक्ट रिपोर्ट मिळू शकतात.

7. कच्चा माल स्रोत

व्यवसाय निश्चिती करताना सर्वप्रथम आपण त्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल व त्या मालाचा पुरवठा कसा होणार याचा अभ्यास करावा. पुरवठादारांची माहिती घेऊन ठेवावी. कोटेशन घेऊन ठेवावेत. कच्चा माल पुरवठादार व कच्चामालाची गुणवत्ता याची माहिती घ्यावी. व्यवसायाला आवश्यक तेवढा कच्चा माल घ्यावा. सुरवातीच्या काळात जास्तीचा माल घेवू नका. सुरुवातील डिस्काउंट रेट मधेच, थोडाच माल खरेदी करावा. पैसा खेळता ठेवावा.

8. कर्ज

व्यवसायामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता झाल्यावर आपण कर्जासाठी वित्तीय संस्था कडे अर्ज करू शकतो. भारत सरकारच्या वेगवेगळ्या सबसिडी चा योग्य असा वापर आपण व्यवसायामध्ये करावा. व्यवसायाच्या प्रोजेक्ट रिपोर्ट च्या अंदाजाने कर्जासाठी आवेदन करावे. आपल्या सर्व गोष्टींची पूर्तता झाली तरच आपण कर्जासाठी केलेलं आवेदनाची पूर्तता होऊ शकते.

९. व्यवसायामधील मुलभूत गोष्टी

  • व्यवसायासाठी योग्य जागा निश्चित करणे आवश्यक आहे. जागा निश्चिती योग्य असेल तर व्यवसायातील वेळ, पैसा, श्रम वाचण्यास मदत होईल.
  • व्यवसायाच्या प्रकारानुसार आपल्या व्यवसायाची इमारतिचे बांधकाम करावे.
  • मशनरी आणि त्याचे अचूक ज्ञान असलेल्या कामगारांचे नियोजन हे बाधकाम असताना करून घ्यावे.
  • कार्यसंघ तयार करावा व त्यांना योग्य ज्ञान व ट्रेनिंग द्यावे.

१०. प्रोसेसिंग आणि Packaging

व्यवसायामधील आवश्यक गोष्टींचा setup झाल्यानंतर प्रोसेसिंग ची योग्य माहिती करून घ्यावी. प्रत्यक्ष उत्पादन घ्यायला सुरुवात करावी. पॅकिंग करताना योग्य काळजी घ्यावी, व त्यात काही बदल आवश्यक आहेत का याचाही अंदाज घ्यावा. गरजेनुसार त्यात सुधारणा देखील करावी. सुरुवातीला काही ट्रायल घ्याव्या लागतात. त्यामध्ये देखील बऱ्याच चुका होऊ शकतात. त्या चुका सुधारुन दोषमुक्त प्रोडक्ट मार्केट मध्ये आणावे. प्रोडक्ट परफेक्ट बनत नाही तोपर्यंत बाजारात आणू नये.

११. व्यवसायाची जाहिरात करा

एकदा व्यवसाय चालू झाल्यानंतर जाहिरात करणे गरजेची आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योग्य जाहिरात करणे चालू करा.आपल्या व्यवसायाचा अधिक प्रभावी पणे कसा प्रचार करायचा ह्याची रणनीति ठरवू शकता.ह्या मुळे योग्य ग्राहकापर्यंत आपली जाहिरात पोहचेल. आपल्या व्यवसायाची मार्केट मध्ये जाहिरात झाली, त्यांतर विक्री ला सुरवात करा.

१२. विक्री

आता प्रत्यक्ष विक्रीची सुरुवात झाली आहे. मार्केट चा पूर्ण ज्ञान आणि सर्वे करून विक्रीची सुरुवात करावी. सेल्स प्रतिनिधींना योग्य मार्गदर्शन करावे. किमान एक सेल्स मॅनेजर नेमावा जो अनुभवी असेल. विक्री ची सुरुवात हि व्यवसायाची सर्वात महत्वाची पायरी असते. कारण आता फक्त यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.

  • विक्री सुरु झाल्यानंतर सहा महिने फक्त ग्राहक वाढवण्यावर भर द्यावा, नफ्या तोट्याचा हिशोब दूर ठेवावा.
  • सहा महिन्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय करताना येणाऱ्या अडी-अडचणींवर अभ्यास करून मार्ग शोधावा, योग्य आर्थिक ताळेबंदाचे नियोजन करावे.
  • किमान एक दोन वर्षे आर्थिक फायद्याचा विचार न करता कंपनी योग्य परिस्थित चालू राहील याची काळजी घ्यावी.
  • कोणत्याही प्रकारे उधारीच्या चक्रात अडकू नका, मार्केट मध्ये उधारी आवश्यक असली तरी तुमच्या टर्नओव्हर च्या 30% पेक्षा जास्त उधारी होणार नाही याची काळजी घ्यावी.

व्यवसाय सुरु करताना वरील सर्व गोष्टींचा आभ्यास करणे गरजेचे आहे.

धन्यवाद …..

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

4 thoughts on “व्यवसायसुरु करताना महत्वाचे टप्पे | Important Steps in Starting a Business |”

Leave a Comment