Business Ideas for Village | गावामधील व्यवसाय कल्पना |

Business Ideas for Village | गावामधील व्यवसाय कल्पना || व्यवसाय म्हणजे ग्राहकांच्या गरजा आवड-निवड लक्षात घेऊन सुरु केलेला धंदा. उदा- किराणा दुकान, मेडिकल, स्वताच हॉटेल, ऑनलाईन सेवा केंद्र कोणत्याही प्रकारचे उत्पादन किवा सर्व्हिस विकून नफा कमावला जातो. अशा सर्व प्रकारच्या गोष्टीना व्यवसाय असे म्हणतात. आपण आपल्या गावात राहून करू शकतो असे काही व्यवसाय व त्यांची सविस्तर माहिती दिली आहे. अलिकडच्या वर्षांत, खेड्यांमध्ये व्यवसायाच्या संधी शोधण्यात स्वारस्य वाढत आहे, कारण शहरी लोक शांत जीवनशैली शोधतात आणि उद्योजक न वापरलेल्या बाजारपेठा शोधतात. ही प्रवृत्ती केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनातच हातभार लावत नाही तर अनन्य आणि शाश्वत व्यावसायिक संभावनाही आहे.

Village Business Idea
किराणा दुकान –

प्रत्येक व्यक्तीला खाद्य पद्दर्थाची गरज असते. आणि अशा रोज लागणाऱ्या वस्तू व त्याची गरज लक्षात घेऊन आपण किराणा दुकान आपल्या गावात, वाडीत सुरु करून उत्तम नफा कमावू शकतो. योग्य प्रकारे चालवल्यास दरोरोज आपण नफा मिळवू शकतो.

फळे,भाजीपाला विक्री-

गावात प्रत्येकाची अशी मुबलक जागा आणि पाण्याची सुविधा असते. याचा योग्य वापर करून आपण भाजीपाला तयार करू शकतो त्याचसोबत घाऊक विक्रेत्या कडून विकत घेऊन आपल्या गावात आपण फळे आणी भाजीपाला विकून पैसे कमावू शकतो. दरोरोज लोकांना ताजी भाजी आवश्यक असते आणि हा व्यवसाय खूप महत्वाचा आहे.

कृषी केंद्र , बी बियाणे व औषधे दुकान –

गावातील प्रत्येक कुटुंब हे शेती करते त्यांना योग्य प्रकारचे बी बियाणे आवश्यक खते व माहिती देणारे केंद्र सुरु करून आपल्या गावच व आपल स्वताच इन्कम निर्माण करू शकता. आवश्यक असलेले परवाने व दाखले त्यांची पूर्तता करून हा व्यवसाय करू शकतो.

फोटोग्राफी-

फोटोग्राफी हा व्यवसाय आपल्या केलेवर निर्धारित आहे. जर आपल्याकडे योग्य प्रकारे फोटो काढण्याची कला असेल तर हा व्यवसाय आपल्या गावापासून तालुक्या पर्यंत करू शकता. आपल्या कलेची छाप निर्माण करून आपल्या गावातील सर्व प्रकारचे कार्यक्रम लग्न, मैफिल, वाढदिवस इत्यार्दी प्रकारच्या सर्व कार्यक्रमात आपल्याला ऑर्डर मिळतील.

जनरल – स्टेशनरी स्टोअर-

आपल्या गावात आपला व्यवसाय करायचा असेल तर जनरल -स्टेशनरी स्टोअर हा देखील एक व्यवसाय सुरु करा. गावातील मध्यवर्ती ठिकाणी आपण विविध प्रकारची पुस्तके, वह्या, पेन, शाळांसाठी तसेच विध्यार्थी वर्गाला लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या स्टोअर मध्ये ठेऊ शकता. लोकांना लागण्यार्या सर्व वस्तू उपलब्ध करून देवू शकता.

इलेक्ट्रोनिक एक्सेसरीज व रिपेरिंग-

डिजिटल युगात गाव असो व शहर प्रत्येक व्यक्ती इलेक्ट्रोनिक वस्तू वापरत आहे उदा- मोबाईल, laptop, घड्याळ विविध प्रकारचे ग्याजेट. इलेक्ट्रोनिक वस्तू या कधी तरी काही कारणास्तव बंद पडतात व याचा विचार करून आपण गावात हा व्यवसाय सुरु केला तर याला खूप मागणी राहील. त्याच सोबत आपण मोबाईल रिचार्ज, नवीन-जुने खरेदी विक्री, संगनक दुरुस्ती इत्यार्दी सुरु करू शकता.

ऑनलाइन सर्विस सेंटर ( ई-मित्र)-

प्रत्येक गावात याची खूप मागणी आहे, गावातील लोकांना आपल्या शिक्षणाचा वापर करून विविध ऑनलाईन सेवा देऊन आपण आपला व्यवसाय करू शकतो. गावातील लोकांचा ई-मित्र बनून विविध दाखले, त्याचे ID कार्ड, XEROX, लोन संबधित सेवा, बँक मित्र म्हणून हि काम करून मोठ्या प्रमाणात आपल नाव व पैसा कमावू शकता.

हॉटेल/स्नॅक्स सेंटर (बेकरी प्रोडक्ट )-

शहर असो की गाव प्रत्येक ठिकाण खावय्यांची कमी नाही, चवीन खाणारे सर्वत्र आहेत. त्यामुळे आपण हॉटेल सुरु करू शकता. चहा, वडापाव, मिसळ इत्यार्दी त्याच सोबत आपण बेकरी प्रोडक्ट पाव,ब्रेड,खारी,टोस्ट सर्व पदार्थ विकू शकता. हॉटेल व्यवसायला कधी धोका नाही.

  1. कृषी-पर्यटन उपक्रम.
  2. हस्तकला कार्यशाळा.
  3. फार्म-टू-टेबल रेस्टॉरंट्स. (Farm-to-Table Restaurants)
  4. पाककृती पर्यटन अनुभव.
  5. आरोग्य आणि वेलनेस रिट्रीट्स.
  6. हेरिटेज होमस्टे.

खेड्यांमध्ये व्यवसायांची भरभराट होण्याची शक्यता अफाट आणि वैविध्यपूर्ण आहे. ग्रामीण सामर्थ्याचा उपयोग करून, उद्योजक शाश्वत उपक्रम तयार करू शकतात जे या समुदायांच्या आर्थिक वाढीसाठी आणि सांस्कृतिक संरक्षणासाठी योगदान देतात. खेड्यातील जीवनातील साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे कौतुक करण्याच्या दिशेने जग वळत असताना, या व्यावसायिक कल्पना स्वीकारणे केवळ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकू शकत नाही तर स्थानिक आणि अभ्यागत दोघांवरही कायमचा सकारात्मक प्रभाव टाकू शकते.

व्यवसाय म्हणजे आपल्याला काही तरी विकायचं आहे. हे लक्षात ठेऊन आपण काय विकू शकतो हे निश्चित करून काम सुरु करा.

धन्यवाद…

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

1 thought on “Business Ideas for Village | गावामधील व्यवसाय कल्पना |”

Leave a Comment