Documents Need to Start a Business |व्यवसायसुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |

Documents need to start a business : व्यवसाय सुरु करताना आपण मार्केटिंग आणि सेल्स यावर अधिक महत्व देतो व ते कस कराव यावर लक्ष केंद्रित करतो परतू व्यावसायाच्या प्राथमिक म्हणजेच व्यवसाय सुरु करताना …. आपल्याकडे आवश्यक असणारे कागदपत्र यांविषयी माहिती घेवू.

व्यवसाय म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने नियमितपणे केलेली आर्थिक क्रिया, ज्याद्वारे वस्तू किंवा सेवा पुरवून नफा कमविण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवसायामध्ये उत्पादन, वितरण, विक्री, आणि व्यवस्थापन या सारख्या विविध प्रक्रियांमध्ये समाविष्ट असतो. व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नफा कमविणे आणि ग्राहकांच्या आवश्यकतांची पूर्तता करणे. व्यवसायाचे काही मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

Documents Need to Start a Business ?

PAN कार्ड –

पॅन कार्ड म्हणजे कायम खाते क्रमांक (Permanent Account Number )हा एक ओळख क्रमांक आहे. पॅन हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो भारताच्या प्रत्येक कर देणार्‍या घटकास खालीलसह सक्षम करतो:

  1. ओळखपत्र
  2. पत्ता
  3. कर भरण्यासाठी आवश्यक
  4. व्यवसायाची नोंदणी
  5. आर्थिक व्यवहार
  6. बँक खाती उघडण्याची

आधार व PAN कार्ड लिंक मोबाईल नंबर –

आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर तसेच इमेल लिंक करून घेणे गरजेचे आहे. आपण तयार करणारे दाखले, व्यवसाय परवाने हे OTP ने होत असतात. जर आपला मोबाईल लिंक नसेल तर हे दाखले तयार होणार नाहीत तर सर्वप्रथम आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून घ्या.

व्यवसाय नोंदणी –आपल्या व्यवसायाची प्रथम पायरी हि व्यवसाय नोंदणी ने होत असते. व्यवसायाची नोदणी हि आपण जर एखादे दुकान टाकणार असाल तर शॉप लायसन्स त्याचप्रमाणे सर्व्हिस असल्यास उद्यम नोदणी अनिवार्य आहे.

बँक अकाउंट –आपले बँक अकाउंट हे सेव्हिंग किवा करंट असते. उद्यम नोंदणी साठी आपल्याला स्वताच सेव्हिंग अकाउंट असायला लागत. करंट अकाउंट हे आपल्या व्यवसायाच असते. नवीन डिजिटल जगतामध्ये बँक अकाउंट हे फार महत्वाचे आहे.

लायसन्स – आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळे लायसन्स गरजेचे असतात. SHOP ACT, उद्यम नोंदणी, FSSAI- फूड लायसन्स, FDA Manufacturing. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था याचे लायसन्स गरजेनुसार बनवून घ्यावेत.

मार्केटिंग मटेरीयल – आपल्या व्यवसायानुसार मार्केटिंग मटेरियल तयार करून घ्यावेत. लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड, ब्रोशर, पामप्लेट, डिजिटल मार्केटिंग मध्ये Facebook, website इत्यार्दी चा वापर करावा.

खालील कागदपत्रांपैकी ठराविक लागतात.

  1. PAN कार्ड , आधार कार्ड , पासपोर्ट
  2. पासपोर्ट फोटोग्राफ
  3. मोबाईल नंबर , ई-मेल आयडी
  4. धंद्याच्या जागेचा पुरावा – भाडेकरारनामा , lease अग्रीमेंट , तेथील अलीकडील वीजबिल , घरपट्टी , पाणीपट्टी इत्यादी
  5. शॉप ऍक्ट लायसेन्स
  6. GST रेजिस्ट्रेशन
  7. व्यवसायाच्या प्रकारानुसार – ड्रग लायसेन्स , FDA licesne इत्यादी .

अधिक माहिती – Business Ideas for Village | गावामधील व्यवसाय कल्पना |

मी Shubahankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

1 thought on “Documents Need to Start a Business |व्यवसायसुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |”

Leave a Comment