दोस्तोहो तुमच स्वप्न आहे पोलीस होयाच तर महाराष्ट्र सरकार २०२४ मध्ये आपल्यासाठी Maharashtra Police Bharti 2024 हि एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे ती म्हणजे पोलीस विभागांतर्गत तब्बल १७००० रिक्त पदांसाठी पोलीस भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने १७००० पदांसाठी मेगा भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी व पोलीस होण्याच स्वप्न साकार करण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्व अर्ज करावा. या भरती संदर्भात महाराष्ट्र पोलीस खात्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी संपूर्ण लेख वाचणे महत्त्वाचे आहे.

Maharashtra Police Bharti 2024 माहिती
विभागाचे नाव | महाराष्ट्र पोलीस विभाग (Maharashtra Police Bharti 2024) |
भरती | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
एकूण पोस्टची संख्या | 17471 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र (जिल्ह्यानुसार) |
पोस्टचे नाव | पोलीस शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर, सशत्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 05 मार्च 2024 |
अर्ज समाप्ती तारीख | 31 मार्च 2024 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | mahapolice.gov.in |
पोलीस भरतीसाठी उमेदवाराची पात्रता
Police Bharti 2024 ची तयारी सुरु करत असताना इच्छुक उमेदवारांनी प्रथमता या गोष्टीकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, शारीरिक चाचणी या महत्वाच्या बाबी आहेत.
शैषणिक पात्रता
महाराष्ट्र पोलिसात शिपाई पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या मित्रानो आपल शिक्षण हे मान्यताप्राप्त बारावी बोर्ड मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत तुमच्याकडे स्वताच ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ वर्ष पूर्ण ते २८ वर्षाच्या दरम्यान असावे. त्याचप्रमाणे SC/ST साठी + ५ वर्षे सवलत तर OBC साठी + ३ वर्षे सवलत आहे. खेळाडू असल्यास त्याला ५ वर्षे सवलत मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
Maharashtra Police Bharti 2024 साठी इच्छुक उमेदवारांची शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी, वैद्यकीय चाचणी केली जाईल.
- लेखी चाचणी
- शारीरिक क्षमता चाचणी
- वैद्यकीय तपासणी
शारीरिक चाचणी
पोलीस भरती मध्ये सर्वात म्हत्वाची असणारी चाचणी म्हणजेच शारीरिक चाचणी त्याला आपण फिझीकल असेही म्हणतो. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी छाती, उंची, लांब उडी, पूल अप्स, धावणे, गोळा फेक हे घटक असतात. महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळा फेक हे घटक असतात.
पुरुष – छाती – न फुगवता : ७९ सेंमी आणि फुगवून : ८४ सेंमी
पुरुष उंची – १६५ सेंमी
महिला उंची – १५५ सेंमी
शारीरिक क्षमता चाचणी घटक
शारीरिक क्षमता चाचणी | |||
पुरुष उमेदवारांसाठी | महिला उमेदवारांसाठी | ||
१६०० मी. अंतर धावणे | ८०० मी. अंतर धावणे | ||
वेळ | गुण | वेळ | गुण |
५ मी. १० से. किवा त्यापेक्षा कमी | २० | 2 मी. 40 से. किंवा त्यापेक्षा कमी | २५ |
५ मी १० से. ते ५ मी. 30 से. | १८ | 2 मी. 40 से. ते 2 मी. 50 से. | २२ |
५ मी. 30 से. ते ५ मी. ५० से. | 16 | 2 मी. 50 से. ते 3 मी | १८ |
५ मी. ५० से. ते ६ मी. १० से. | १४ | 3 मी. ते 3 मी. 10 से. | १६ |
६ मी. १० से. ते ६ मी. 30 से. | १२ | 3 मी. 10 से. ते 3 मी. 20 से. | १० |
६ मी. 30 से. ते ६ मी. ५० से. | १० | 3 मी. 20 से. ते 3 मी. 30 से. | ६ |
६ मी. ५० से. ते 7 मी. १० से. | ६ | ||
गोळा फेक | |||
पुरुष उमेदवारांसाठी – ७.५० Kg | महिला उमेदवारांसाठी ४ Kg | ||
अंतर | गुण | अंतर | गुण |
8.50 मी. किंवा त्यापेक्षा जास्त | २० | 6.00 मी. किंवा त्यापेक्षा जास्त | २५ |
7.90 मी. ते 8.50 मी. | १८ | 5.50 मी. ते 6.00 मी. | २० |
7.30 मी. ते 7.90 मी. | १६ | 5.00 मी. ते 5.50 मी. | १५ |
6.70 मी. ते 7.30 मी. | १४ | 4.50 मी. ते 5.00 मी. | १० |
6.10 मी. ते 6.70 मी. | १२ | 4.00 मी. ते 4.50 मी. | ५ |
5.50 मी. ते 6.10 मी. | १० | 4 मी. पेक्षा कमी | ० |
4.90 मी. ते 5.50 मी. | ८ | ||
लांब उडी | |||
अंतर | गुण | अंतर | गुण |
5 मी. किंवा त्यापेक्षा जास्त | २० | 3.80 मी. किंवा त्यापेक्षा जास्त | २५ |
4.75 मी. ते 5.00 मी. | १८ | 3.50 मी. ते 3.80 मी. | २१ |
4.50 मी. ते 4.75 मी. | १६ | 3.20 मी. ते 3.50 मी. | १८ |
4.25 मी. ते 4.50 मी. | १४ | 2.90 मी. ते 3.20 मी. | १५ |
4.00 मी. ते 4.25 मी. | १२ | 2.60 मी. ते 2.90 मी. | १२ |
3.50 मी. ते 4 मी. | ९ | 2.30 मी. ते 2.60 मी | ९ |
पूलअप्स २० गुण | १०० मी धावणे | ||
एकूण पूलअप्स | गुण | सेकंद | गुण |
10 पुलअप्स | २० | १४ से. | २५ |
9 पुलअप्स | १६ | १५ से. | २२ |
8 पुलअप्स | १२ | १६ से. | १८ |
7 पुलअप्स | ८ | 17 से. | १४ |
6 पुलअप्स | ४ | १८ से. | १० |
लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी झाल्यानंतर सर्वात महत्वाची लेखी चाचणी पोलीस भरतीसाठी असते. जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करतील त्याच्या मधून गुणवत्ता क्रमांकानुसार नमूद केलेल्या १:१० या प्रमाणात उमेदवारांना १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. नेहमीत मेहनत आणि ३ ते 4 महिने सतत सराव केला तर नक्की यश संपादन करू शकता.
लेखी परीक्षेत खालील घटकांचा समावेश असणार आहे – चालू घडामोडी, अंकगणित, सामान्यग्यान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण.
लेखी चाचणी कालावधी हा १ तास ३० मिनिटांचा असणार आहे. प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेत व सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत.
उमेदवारासाठी आवश्यक कागदपत्रे
उमेद्वाराजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे- त्यामध्ये ओरिजिनल आणि झेरॉक्स असे दोन सेट तयार करणे गरजेचे आहे. त्याचसोबत ५ फोटो स्वत जवळ बाळगणे आवश्यक आहे.
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र – बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणी दाखला
- अधिवासी (डोमेसाईल) दाखला
- उत्पन्न दाखला सोबत नॉन क्रीमिलीयार प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत सबंधित जिल्हा पूनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाई अर्ज कसा करावा ? Maharashtra Police Bharti 2024 Online Application Process
- पोलीस भरतीचा अर्ज भरत असताना सर्व प्रथम महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटला mahapolice.gov.in. भेट द्या.
- आपल्याला मुख्यपृष्ठावरील “भरती” या नावावर क्लिक करा. आणि महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२४ या विषयाची लिंक निवडा.
- दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या.
- ऑनलाईन अर्ज करा या ठिकाणी क्लिक करा.
- आता आपल्यासमोर अर्ज दिसेल त्यामध्ये आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र, सही योग्य व आवश्यक सर्व माहिती भरून झाली की उपलब्ध पद्धतीने अर्ज फी भरा.
- सर्व भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या, पुन्हा एकदा सर तपशील तपासून घ्या.
- सर्व माहिती तपासून झाल्यावरच “सबमिट” या ठिकाणी क्लिक करा.
- अंतिम टप्यात भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
दोस्तोहो अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. उमेदवाराने एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन करावे. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ अर्ज फी
पोलीस भरती २०२४ मध्ये अर्जाची रक्कम हि खुल्या प्रवर्गातील उमेंद्वाराना 450/- रुपयेव मागासवर्गीय उमेदवारांना 350/- रुपये आहे. अर्जाची रक्कम हि ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे. फी भरल्यावरच आपल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे नाहीतर अर्ज फेटाळला जाईल याची दक्षता घ्या. अर्जाची फी हि एकदा सबमिट केल्यावर पुन्हा रिफंड मिळणार नाही.
मित्रानो हा लेख आपल्या पोलीस होणार्या मित्र – मैत्रीणीना पाठवा. म्हणजेच त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा लेख मार्गदर्शक ठरेल. तुमच्या सर्वांचे पोलीस होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. नव्या जोशाने आणि ताकदीने तयारीला सुरवात करा. सर्व इच्छुक मित्र- मैत्रीणीना पोलीस भरती २०२४ साठी खूप साऱ्या शुभेचा. काही माहिती आवश्यक असल्यास कमेंट करा त्याची पूर्तता लवकरात लवकर करण्यात येईल.
धन्यवाद…..
Mukhyamantri Solar Pump Yojana |मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना https://s2carrer.com/mukhyamantri-solar-pump-yojana-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80/
Good information
Maharastra polis puna