Majhi Kanya Bhagyashree Yojana या योजनेची सुरवात महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१६ रोजी केली आहे. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. दोन मुली असलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजना कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे वयाची होईपर्यंत लाभ घेता येईल. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ (Majhi Kanya Bhagyashree Yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये देते. या योजने अंतर्गत एक व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल (BPL) ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये आहे असे लोक फक्त लाभ घेत होते परंतु नवीन नियमानुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे ते देखील Maharashtra Majhi Bhagyashree Kanya Yojana 2024 साठी पात्र आहेत.
Majhi Kanya Bhagyashree योजनेचा उद्देश-
आपल्याला माहीत आहे की, समाजात मुलगी जन्माला आली तर त्यांना गौण स्थान दिल जाते किंवा काही ठिकाणी भ्रूण हत्या केली जाते. या कृत्यांना रोखण्यासाठी व मुलींना चांगल आयुष्य जगता याव हा मुख्य उद्देश आहे.त्याचप्रमाणे मुलींचा जन्मदर वाढवणे. लिंग निवडीस प्रतिबंध करणे व मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे.
Majhi Kanya Bhagyashree योजनेचे लाभ
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर कुटुंब हे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाचे बँक मध्ये संयुक्त (जोड) खाते उघडावे व त्यांना १ लाख रुपये पर्यंत विमा आणि ५००० रुपये चा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. या योजने नुसार एका मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना 50 हजार रुपये मिळतात. त्याचबरोबर दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर 25-25 हजार रुपये दिले जातात.
माझी कन्या भाग्यश्री योजनेतील नियम आणि अटी
- या योजनेचा लाभ एका परिवारातील दोन मुलींना मिळेल.
- मुलीचे आई वडील हे महाराष्ट्रातील रहिवासी असावेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगी जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र असतील.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना लागू आहे.
- एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ घेता येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कागदपत्रे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhar Card) असणे आवश्यक आहे.
- आई आणि मुलीचे बँक खाते पासबुक (Bank Account)
- मोबाई नंबर
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी पत्ता (Resident Address Proof) पुरावा असावा.
- उत्पन्नाचा दाखलाही (Income Proof) आवश्यक आहे.
- कुटुंबात तिसरे अपत्य असले तरी, या योजनेंतर्गत फक्त दोन मुलींच्या नावाने लाभ घेता येतो.
Majhi Kanya Bhagyashree Yojana अर्ज कसा करावा ?
माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तो काळजीपूर्वक वाचून भरावा लागेल. जर काही चूक झाली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील. या योजनेचा अर्ज करणे खूप सरळ आणि सोपं आहे. या मध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागणार नाही.
• महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://maharashtra.gov.in
• या मधील फोर्म डाउनलोड करा आणि अर्ज भरा.
• फॉर्ममध्ये आवश्यक कागदपत्रे जोडा आणि फॉर्म महिला आणि बाल विकास कार्यालयाकडे पाठवा.
• सरकार यावरती तपशीलांची पडताळणी करेल.
• एकदा मंजूर झाल्यावर सरकार पैसे जमा करेल.
• तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रातूनही अर्ज आपल्याला गोळा करता येतील.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024: Majhi Bhagyashree Kanya Yojana ही मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि महाराष्ट्रातील शाश्वत विकासाला योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक सहाय्य यावर लक्ष केंद्रित करते. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा उद्देश मुलींचा दर्जा उंचावणे आणि लिंगभेद दूर करणे हे आहे. या योजनेमुळे लैगिक समानता आणि सर्व समावेशक विकास होईल.
अधिक माहिती व लेख मिळवण्यासाठी या https://s2carrer.com/ संकेतस्थळा भेट द्या.
2 thoughts on “माझी कन्या भाग्यश्री योजना 2024: Majhi Kanya Bhagyashree Yojana”