Mukhyamantri Solar Pump Yojana |मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |

शेतकारांच्या सर्वांगी विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, Mukhyamantri Solar Pump Yojana सुरु केली. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा राज्य सरकारचा या योजने अतर्गत महत्वाचा हेतू आहे. या योजने मधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी सौरपंप उपलब्ध करून देणार आहे. शेतकर्यांकडील जुने डीझेल, इलेक्ट्रिक व हातपंप यांचे रुपांतरीत सोलर पंपामध्ये होईल. मुख्यमंत्री सौर पंप योजनेंतर्गत (Mukhyamantri Solar Pump Yojana) नवीन सौर पंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासन अनुदान देईल.

Mukhyamantri Solar Pump Yojana २०२३/२०२४

महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri Solar Pump Yojana अंतर्गत शेतकर्‍यांना सुमारे १००००० कृषिपंप देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला अटल सौर कृषी पंप योजना म्हणून देखील ओळखल जाते. या योजनेमधून सुमारे १ लाख कृषी पंप बसवण्याचे शासनाचे धोरण आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०१९ पासून चालू आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ मिळवला आहे. अजूनही इच्छुक शेतकर्‍यांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देवून अर्ज प्रक्रिया करून लाभ घेऊ शकता.

Mukhyamantri Solar Pump Yojana उद्दिष्टे

महाराष्ट्र सरकारचे ध्येय हे शेतकर्‍यांना त्यांच्या डीझेल आणि इलेक्ट्रिक पंपाच्या त्रासातून मुक्त करणे. काही ठिकाणी डीझेल व वीज देखील पोहचत नाही त्याठिकाणी राबणाऱ्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप उपलब्ध करून देणे हा उद्धिष्ट आहे. शेतकर्‍याला या योजने मध्ये पंपाच्या किमतीच्या सुमारे ९५% अनुदान मिळणार आहे व लाभार्त्याने फक्त ५% भरायचे आहे. या योजने मुळे शेतकर्‍यांना कमी किमतीत पंप मिळणार आहे. या सौर पंपामुळे पर्यावरणाचा ह्रास देखील होणार नाही.

Mukhyamantri Solar Pump Yojana |मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री सौर पंप योजना महाराष्ट्र
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील शेतकरी वर्ग
योजनेचा उद्धेशशेतकर्‍यांना सौरपंप उपलब्ध करून देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाई
राज्य सरकार वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/
योजनेची माहिती .

Mukhyamantri Solar Pump Yojana फायदे

  • सौरपंपाच्या वापरामुळे शेतकर्‍यांना लागणारा इंधांवरील खर्च कमी होईल, पंपाला लागणारी वीज सूर्यप्रकाशातून विनामुल्य मिळणार आहे. शेतकऱ्याच्या खर्चात बचत होईल.
  • शेतजमीन जर ५ एकरपेक्षा कमी असेल तर सर्व शेतकर्‍यांना ३HP पंप आणि मोठ्या प्रमाणवर असलेल्या शेतासाठी 5HP पंप मिळणार आहे.
  • शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा प्राप्त झाल्यामुळे पिक उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढेल, कृषी उत्पादनातून शेतकर्‍याचे उत्पन्न वाढेल.
  • इधन पंपामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संवर्धन होईल. सोलर पंप देखभाल करण्यासाठी कमी वेळ आणी पैशाची बचत होईल.

Mukhyamantri Solar Pump Yojana पात्रता –

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजने अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकर्‍यांना खालील निकष पूर्ण केले पाहिजे –

  • शेतकरी हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • ज्या शेतकर्‍यांकडे आधीच वीज जोडणी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • ज्या शेतकर्‍यांना वनविभागाच्या NOC अजूनही वीज पोहोचलेली नाही, ते शेतकरी या योजनेसाठी पत्र मानले जातील.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी जलस्त्रोत्र म्हणजे नदी, नाले, स्वताचे व सामाईक शेततळे आणि विहिरी असणे गरजेचे आहे.

Mukhyamantri Solar Pump Yojana कागदपत्रे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रहिवाशी, पत्त्याचा पुरावा
  • शेतीची कागदपत्रे
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Mukhyamantri Solar Pump Yojana लाभार्थी हिस्सा

लाभार्थी3HP पंप लाभार्थी हिस्सा 5HP पंप लाभार्थी हिस्सा
सर्वसाधारण२५५००=१०%३८५००= १०%
अनुसूचित जाती१२७५० = ५%१९२५० = ५%
अनुसूचित जमाती१२७५० = ५%१९२५० = ५%
लाभार्थी हिस्सा हा वरील प्रमाणे असेल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

मुख्यमंत्री सौर पंप योजना २०२३/२४ अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनि खालील बाबींचा अवलंब करावा.

  • अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सौर कृषी पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागले.
  • होम पेजवरती तुम्हाला साभार्थी सेवांचा पर्याय दिसेल. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला New Consumer या पर्यायावर क्लिक करा.
  • याठिकाणी अर्जाचा फोर्म तुमच्यासमोर उधडेल. या अर्जामध्ये विचारलेली सर्व योग्य माहिती भरावी लागेल. सशुल्क प्रलंबित एजी कनेक्शन ग्राहक तपशील, अर्जदाराची माहिती, स्थान- जवळचा MSEDCL ग्राहक क्रमांक, निवासी पत्ता. त्याचप्रमणे सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
  • सर्व माहिती आणि कागदपत्रे जोडल्यानंतर सबमिट अर्ज बटनावर क्लिक करावे.  अशा प्रकारे आपला अर्ज यशस्वीपणे भरला जाईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती कशी तपासावी ?

अधिकृत वेबसाईटला भेट देऊन याच होम पेज वरती तुम्हाला Beneficiary Services चा पर्याय दिसेल तुम्हाला त्याठिकाणी क्लिक करून Track Application Status या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्जाची स्थिती पाहण्यासाठी लाभार्थी आयडी प्रविष्ट करावा लागेल आणि सर्च बटनावर क्लिक करावे लागले व समोर आपल्याला अप्लिकेशन स्टेटस दिसेल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अधिक माहितीसाठी Contact

या योजनेचे संपर्क डीटेल्स पुढील प्रमाणे – टोल फ्री क्रमांक – 1800-102-3435/ 1800-233-3435

धन्यवाद …

https://s2carrer.com/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%8d/

मी Shubhankar Chavan आपल्यासोबत Success 2 Career च्या माध्यमातून सरकारी योजना, नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन माहिती त्याचप्रमाणे आरोग्य, फायनान्स, lifestyle, Travel, Food सर्व प्रकारची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Sharing Is Caring:

3 thoughts on “Mukhyamantri Solar Pump Yojana |मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |”

Leave a Comment